प्रतिनिधी – शिर्सुफळ येथे विश्वकर्मा युवा प्रतिष्ठान तर्फे विश्वकर्मा जयंती काल साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तुषार भाऊ शिंदे उपस्थित होते. तसेच विश्वकर्मा युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष वैभव थोरात, उपाध्यक्ष संकेत मल्हारे, सचिव प्रवीण चव्हाण, सहसचिव राजू ( पप्पू ) थोरात, तसेच मंडळाचे आधारस्तंभ सुधीर (बंडू ) थोरात, कार्याध्यक्ष दादा थोरात, बारामती तालुका लोहार युथ फाऊंडेशन प्रमुख बबन थोरात, मंडळाचे सदस्य, शिर्सुफळ गावचे ग्रामस्थ व तुषार भाऊ शिंदे युवामंच चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तुषार शिंदे यांच्या कडून सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन काम करून सर्वांची प्रगती करण्याचे काम चालू आहे, त्या कामी सर्वांकडून चांगला प्रतिसाद बारामती व परिसरामध्ये मिळत आहे . तुषार शिंदे यांनी विश्वकर्मा प्रतिष्ठान चे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *