प्रतिनिधी :- दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा सिद्धेश्वर संकुलचे संस्थापक अध्यक्ष तसेच पणदरे पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीमत्व ऍड.केशवराव ( बापू ) जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस पदार्पणनिमित्ताने मानाजीनगर ग्रामविकास मंच व सिद्धेश्वर संकुलचे कर्मचारी वर्ग यांनी ७५ वृक्षाचे रोपण केले. तत्पूर्वी पणदरे गावातील सर्व बापूंचे चाहते या कार्यक्रमासाठी स्वयंप्रेरीत गोळा झाले. त्यात पणदरे ग्रामविकास मंच, आपलं प्रतिष्ठान जहागीदारवस्ती यांचे कार्यकर्ते तसेच पणदरे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित राहिले . त्यावेळी जिजाऊ ज्ञानमंदिरचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप, महादेव शंकर पवार ( MS ) , अभियंता अभय शहा , विजूआप्पा धुमाळ , गणेश बबनराव जगताप, पणदरे ग्रामविकास मंचाचे सदस्य प्रमोद शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मंचाच्या वतीने वृक्षांची महती याबाबत जनजगृती व्हावी या उद्देशाने पूर्वनियोजित अशी पणदरे ते महादेवमाळ म्हसोबावाडी ( मानाजीनगर ) पर्यंत दुचाकीवरून वृक्षरॅली काढण्यात आली. महादेवमाळ परिसरात गेल्यानंतर यापूर्वी मानाजीनगर ग्रामविकास मंचाने केलेले वृक्षारोपण नि त्यांचे संवर्धन पाहून आलेले मान्यवर भारावून गेले. व त्यांनी मंचाच्या कार्यास प्रभावित होऊन असेच कार्य चिरनिरंतर चालू राहावे याकरिता आर्थिकबळ म्हणून अभियंता अभय शहा – ५०००/- , सुरेश खलाटे – ५१००/- , गुलाब हरिश्चंद्र जगताप – ११००/- रोख स्वरूपात दिले. तसेच पणदरे ग्रा. पं. सदस्य मनोज जगताप यांनी मंचाची गरज ओळखून मंचास दोन ड्रीपचे बंडल देऊ केले. त्याठिकाणी महालक्ष्मी फर्निचर बारामतीचे मालक तसेच मानाजीनगर मंचाचे सदस्य मयूर बोबडे यांनी सर्वांना अल्पोपहारची सोय केली. त्याचप्रमाणे घुले परिवाराकडून तेथील झाडांना कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात आली. मंचाच्या सर्वच सदस्यांनी नेहमीप्रमाणेच खूप उत्साहाने वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *