प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , सोमवार दिनांक 04 ऑक्टोबर 2021

बारामती तालुका शिक्षक को क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन सौ. दिपाली साळुंके व व्हाईस चेअरमन श्री. शिवदत्त भोईटे यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त पदासाठी रविवार दिनांक 03 ऑक्टोबर 2021 रोजी चेअरमन पदासाठी सौ. अलका शरद रसाळ यांनी व व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. गणेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती सोसायटीचे सचिव संतोष राऊत यांनी दिली .

सोसायटी मार्फत शिक्षक सहकाऱ्यांच्या हिताचे काम केले जाईल असे नवनिर्वाचित चेअरमन सौ. अलका रसाळ यांनी आश्वासन दिले .

निवडीनंतर बारामती पंचायत समितीच्या माजी उपसभापती शारदाताई खराडे , देऊळगाव रसाळ चे उपसरपंच दत्तात्रय वाबळे , जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ह भ प संजय महाराज वाबळे , सामाजिक कार्यकर्ते आनंद दादा रसाळ व देऊळगाव रसाळ येथील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *