प्रतिनिधी :- आज दिनांक 15/09/2021 रोजी मौजे खडकी येथे ऊस शेती शाळा अंतर्गत एकात्मिक खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन या विषयावर श्री पंकज पवार विषयतज्ञ नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी पाटस श्री. महेंद्र जगताप यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगून महाडीबीटी विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री संजय कदम, कृषी सहाय्यक श्री सय्यद अझर, श्री अंगद शिंदे, अतुल होले व शेतकरी उपस्थित होते.