प्रतिनिधी :- आज ढेकळवाडी ते भवानीनगर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. हा रस्ता होण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकरी यांची बैठक बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महेश ढवाण यांनी गावातील लोकांनी विकासाच्या दृष्टीने सर्वांनी ऐकत्र येऊन गावचा विकास साधला पाहिजे, गावातील तंटे गावातच मिटले पाहिजेत, असे यावेळी ढवाण म्हणाले.
यावेळी तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, संभाजी होळकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रशांत मिसाळ यांनी बरीच वर्षे चाललेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी त्यांचा यावेळी सत्कार केला. यावेळी भालेराव झारगड, उपसरपंच शुभम ठोंबरे, दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, संपतराव टकले, माजी सरपंच बाळासाहेब बोरकर, शिवाजी लकडे, सुभाष ठोंबरे, नानासो घुले, पोलिस पाटील चेतन ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णसाहेब पिंगळे , अवि भिसे, नामदेव ठोंबरे, रामदास पिंगळे उपस्थित होते.