माळेगाव दि.13 (प्रतिनिधी गणेश तावरे ) : दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यामधील ऊस वाहतूकदार यांनी निवेदन देऊन वाहतूक दर वाढ मिळावी ही मागणी केली आहे. सर्व ऊस वाहतुकदार यांनी गळीत 2020-2021 साली ऊस वाहतुक केलेली आहे. तरी मागील सिझनला डिझेल मध्ये वाढ झाली असल्यामुळे त्या वाढीचा फरक मिळावा तसेच सन 2021-2022 वर्षांची सदर वाहतुकीची वाढ मिळावी अशी मागणी सर्व वाहतूक दार यांनी केली आहे. यासह मागील वर्षाचा वाहतुकीचा ७.५% फरक कमिशनसह मिळावा. मागील वर्षाचा टोळीचा वाटखर्ची तातडीने मिळावी. सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाकरिता टोळीसाठी मिळणारा ऑडव्हान्स सोमेश्वर कारखान्याच्या वाहतुक दरांना दिल्याप्रमाने दयावा. सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाचे वाहतुक दरपत्रक हे कारखाना सुरू होण्याआगोदर दयावे . मागण्यांसाठी सर्व वाहतूक दार संघटनेने कारखाना प्रशासनास मागणी केली आहे. यावेळी श्री. प्रकाश महादेवराव सोरटे अध्यक्ष, श्री. संजय बाबुराव खलाटे उपाध्यक्ष, श्री. श्रीपाद दिगंबर तावरे उपाध्यक्ष, श्री. सुनिल यशवंतराव देवकाते खजिनदार, श्री. सचिन संपतराव मोटे सचिव, श्री. जगदिश बबनराव देवकाते, श्री. हेमंत ज्ञानदेव पवार, श्री. वैजनाथ निवृत्ती देवकाते, श्री. प्रमोद भालचंद्र तावरे, श्री. नितिन रंगनाथ चोपडे, श्री. सागर लालासाहेब देवकाते, श्री. सचिन पोपटराव भोसले, श्री. अजिनाथ वसंत देवकाते, श्री. कृष्णाजी आनंदराव गावडे, श्री. सतिश रामचंद्र आटोळे उपस्थित होते.