प्रतिनिधी :- बारामती नगर परिषद शाळा क्र 6 च्या उपक्रमशील उपशिक्षिका सौ.अश्विनी नितीन गायकवाड यांना शैक्षणिक दीपस्तंभ या संपादकीय मंडळाचा शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 5 सप्टेंबर शिक्षक दिन रोजी जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. संपादकीय मंडळाचे अध्यक्ष सुदाम साळुंखे व कार्यकारी अध्यक्ष धनराज सूर्यवंशी व वर्षां सांगवीकर यांनी सौ.अश्विनी गायकवाड यांचे नाव जाहीर केले. राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल विरोधी पक्षनेते व नगरसेवक श्री सुनिल सस्ते यांनी सत्कार केला .तसेच शिक्षण प्रशासन अधिकारी श्री. डामसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक गावीत व इतर शिक्षक वर्ग , राज्य पदाधिकारी सौ.दिपाली गायकवाड, संघाचे अध्यक्ष ढोले, कार्यकर्ते अनिश गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *