माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) दिनांक 6 सप्टेंबर 2019 रोजी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये चालू वर्षाचा अंतिम दर फक्त 2750 रुपये जाहीर केल्याची बातमी सभासदांना मिळाली. या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत चेअरमन व संचालक मंडळाचा जाहीर निषेध करण्यासाठी निरावागज ग्रामपंचायती पुढे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते श्री विठ्ठल देवकाते याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजी संचालक श्री राजेश देवकाते यांनी माळेगाव कारखान्याच्या मागील सहकार बचाव पॅनलचे प्रमुख श्री चंद्रराव अण्णा व चेअरमन श्री रंजन काका यांनी शेतकऱ्यांना 3400 रुपये पर्यंत उच्चांकी दर दिला होता. ती परंपरा या संचालक मंडळाने खंडित केल्याचे यावेळी सांगितले व शेतकरी सभासदांचे मागील वर्षी 70 कोटी रुपये आणि चालू वर्षी 70 कोटी रुपयांचे अशा सलग दोन वर्षांची मिळून 140 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या चेअरमन संचालक बोर्डाचा निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री संपतराव देवकाते, माजी संचालक राजकुमार देवकाते, सभासद भालचंद्र देवकाते, केशव देवकाते, बाळासाहेब फुंदे, नितिन देवकाते, दादा पाटील, दिलीप भोसले, तात्यासाहेब भोसले, व जागृत सभासद उपस्थित होते.