बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे) : कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तरी सुद्धा गणरायाच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी काल दिसून आली.
काल दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी गणरायाच्या आगमनासाठी बारामती शहरातील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या भिगवण रोड वरील (तीन हत्ती चौक ते पंचायत समिती) येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्विस रोड वर गणपती विक्रीचे स्टॉल व सजावटीसाठी लागणाऱ्या इतर वस्तूंचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी आपल्या बाप्पाला घरी आणण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आनंदाने आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात असताना नागरिकांनी कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचे अनेक ठिकाणी दिसुन आले. पोलिस प्रशासनाने बारामतीमधील नागरिकांना आवाहन केले आहे की सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करणे, तसेच मास्कचा वापर करून गणपतीचा सण सुरक्षित साजरा करावा व कोरोना सारख्या महामारी ला रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *