माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मौजे निरावागज येथे महिला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन पिकाचे पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंत अशा प्रत्येक टप्प्याचे प्रशिक्षण महिला शेतीशाळेच्या माध्यमातून सुरू आहे. अशी माहिती कृषी सहाय्यक श्रीमती ज्योती गाढवे यांनी दिली.
क्रॉपसॅप अंतर्गत महिला शेती शाळेचा राष्ट्रीय अजैविक ट्रेस प्रबंधन संस्थान माळेगाव (NIASM) तसेच कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री अशोक पाटील तावरे यांच्या शून्य मशागत तंत्रानुसार करत असलेल्या ऊस व सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट ला भेट देऊन माहिती घेण्यात आली. (NIASM) माळेगाव या ठिकाणी विविध पिकांच्या विविध जातीवर संशोधन सुरू असलेल्या प्रात्यक्षिक पिकांच्या क्षेत्रीय भेटी देऊन माहिती घेण्यात आली व कीटक संग्रहालयास भेट देण्यात आली. यावेळी (niasm) येथील शास्त्रज्ञ डॉक्टर धनंजय नांगरे, कृषी पर्यवेक्षक नेमाजी गोलांडे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री अशोक पाटील तावरे, कृषी सहाय्यक ज्योती गाढवे, कोमल भानवसे, यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निरावागज गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.