रेडनी येथील शिक्षकांनी सुरू केला घरोघरी जाऊन शिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी :- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणारी वडगाव येथील शाळा आणि तेथील शिक्षक श्री संजय खरात यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचा उगम झाला.. संकल्पना आवडल्याने आणि रेडनी शाळेत विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने ही संकल्पना सत्यात उतरवण्याचा संकल्प रेडनी शाळेतील शिक्षिका श्रीमती सुप्रिया गेनबा आगवणे आणि श्रीमती अनिता विठ्ठलराव जाधव यांनी केला.

कोरोना काळात शिक्षण चालू होतं पण हवी तेवढी गती नव्हती. गेल्या शैक्षणिक वर्षात रेडणी शाळेचा स्वयंसेवक स्मार्टफोन उपक्रम पूर्ण जिल्ह्यात राबवला गेला.. त्यापुढे ही एक पाऊल टाकून घरोघरी शाळा हा उपक्रम याच स्वयंसेवकांच्या माध्यमातून आज यशस्वी होताना दिसत आहे..

विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी त्यांच्या अध्ययन स्तर नुसार अध्ययन साहित्य त्यांना उपलब्ध करून याकरता दोन्ही शिक्षकांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक साहित्य वापरून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी शाळा तयार केली आहे..
या उपक्रमाचा अवलंब करताना विद्यार्थ्यांच्या घरात मिळेल त्या जागेचा कोपर्याचा, भिंतीचा वापर करून शैक्षणिक तक्ते अध्ययन साहित्य लावण्यात आले आहे. घराच्या बाहेर गुरांचा गोठा, पाण्याच्या टाक्या, बाहेरील भिंतींवर स्वतः पेंटिंग करून शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे..
ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन समाजातील अशिक्षित व्यक्तीही यांनी आणि ज्ञानगंगेच्या माध्यमातून शिक्षित होणार असा विश्‍वास सुप्रिया आगवणे यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या घरामध्ये शाळा तयार झाल्यामुळे सर्व शैक्षणिक साहित्य सतत डोळ्यासमोर राहून त्यांची शैक्षणिक तयारी नक्कीच चांगली होणार आहे. कोरोणा संकट कमी झाल्यानंतर शाळा नेहमीप्रमाणे चालू होतील परंतु तरीही या उपक्रमा मुळे विद्यार्थ्यांचा फायदा होणारच आहे.
इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री विजयकुमार परीट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे त्याच बरोबर केंद्रप्रमुख हगारे, बोरकर व सांगळे या सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमाची प्रत्यक्षभेट घेऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून त्यांना बक्षीसही गटविकास अधिकारी यांनी दिले. अधिकारी आणि शिक्षक यांच्यातील संवाद हा प्रगतीच्या दिशेने असेल तर राष्ट्रीय संपत्ती असलेली ही लहान मुले नक्कीच देशाचे भविष्य उज्ज्वल करतील असे मनोगत सुप्रिया आगवणे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *