माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) सामाजिक कार्यकर्ते सुरज बुधावले व अक्षय खंडागळे यांनी पोलीस व समाज बांधव यांच्या सहकार्याने आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती महोत्सव सामाजिक पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले. बारामती तालुका पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधव आम्हाला दरवर्षी खूप मोलाचे सहकार्य करतात, यावर्षी पण त्यांनी खूप छान संकल्पना आम्हाला दिली असे आयोजकांनी यावेळी सांगितले. बारामती तालुका पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधव यांनी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच यावेळी मास्क व सैनिटाइझर चे वाटप देखील केले गेले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश ढवाण, बंडगर, विनोद लोखंडे, शिंगाडे, खंडागळे, मरळ, शिरतोडे, जाधव व आदि मान्यवर उपस्थित होते.
आपले पोलीस बांधव, डॉक्टर दिवस – रात्र सामान्य लोकांसाठी जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांच्याप्रती एक छोटासा उपक्रम असल्याची भावना अक्षय खंडागळे व विकी खंडागळे यांनी यावेळी बोलून दाखवली. दरम्यान पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या सामाजिक कामाचे कौतुक केले. तसेच यावेळी ग्रामीण कोविड केअर सेंटर येथे डॉ. घोरपडे व डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योध्दांना फळ व मास्क, सैनिटाइझर याचे वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.