माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) युवा चेतना सामाजिक संस्था नेहमी सामाजिक कार्यात काम करण्यासाठी नेहमीच सक्रिय असते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून युवा चेतना च्या सदस्यांनी आपापल्या शाळेत आणि वेगवेगळ्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये म्हणजे बारामती मधील विद्या प्रतिष्ठान आर्किटेक्चर कॉलेज बारामती. आचार्य अकॅडमी बारामती. अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर लासुरणे, जिल्हा प्राथमिक शाळा ढाकाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदानगर मालेगाव कॉलनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव खुर्द, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा आष्टी, अंगणवाडी नाळेवस्ती माळेगाव, जि.प.प्रा.शाळा संभाजीनगर, (बाहेगाव) ठिकाणी 120 पेक्षा जास्त शिक्षकांना स्वतः तयार केलेली आंब्याची झाडे, काहींना फुले व पेन देऊन त्यांचा सत्कार केला. याठिकाणी युवा चेतना चे सदस्य उपस्थित होते. यामध्ये मनोज पवार, किरण भापकर, अभिषेक पवार, सूरज रणदिवे, प्रज्ञा काटे, निशिगंधा जाधव, उपसरपंच पुनम देशमुख, दिव्या भांडवलकर, रेश्मा नवले, वैष्णवी घोरपडे, सिद्धी तावरे, श्रद्धा घोरपडे, ऋतुजा घोलप, प्रतीक्षा जाधव, राघिणी वसव, प्रियंका सासवडे इत्यादी उपस्थित होते.