प्रतिनिधी- शनिवारी इंदापुर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मेळावा व इंदापुर युवक काँग्रेस शाखा उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी दत्तात्रय भरणे, महेबूबभाई शेख, प्रदीप गारटकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. मी मुंबईत जाऊन मिरवत नाही तर काम करतो. इंदापुरच्या हक्काचे पाणी मी आनणारच अशा खोचक शब्दात भरणे यांनी बोलताना विरोधकांना टोला लगावला. याचं कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक , विद्यार्थी, व महिला काँग्रेस नविन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. निमसाखर येथिल अतुल जाधव यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या इंदापुर तालुका कार्याध्यक्ष पदी तर लाखेवाडी येथील प्रवचन कीर्तनकार व्याख्याते नवनाथ माने यांची युवकच्या मुख्यप्रवक्ते पदी निवड करण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, प्रताप पाटील, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सचिन सपकळ, अतुल झगडे, सचिव घेतकुळे, स्वप्नील कोंडे देशमुख, बाळासाहेब ढवळे उपस्थित होते. युवकचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले तर कार्यध्यक्ष सचिन खामगळ व विध्यार्थी चे अध्यक्ष प्रदीप व्यवहारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *