माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) शिक्षक दिनाच्या निमित्ताने बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यातील विशेष उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव समारंभ रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी भवन येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते बारामती तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक व पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक म्हणून रोपटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने बारामती तालुक्यातील शाळा व शिक्षक संपर्क अभियानाची सुरुवात शिक्षक सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. कार्यक्रमाला बारामती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. ए. धायगुडे धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.आर.गवळी, जय मल्हार हायस्कुल जांबुत ता.शिरूरचे मुख्याध्यापक शिवाजीराव धायगुडे, तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष खोमणे, नाकुरे , सिकंदर शेख यांच्यासह शिक्षक सेलचे पदाधिकारी विविध शाळांचे शिक्षक-शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी तर प्रास्ताविक तालुका शिक्षक सेलचे अध्यक्ष नागनाथ ठेंगल यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अर्जुन मलगुंडे यांनी केले.
गौरविण्यात आलेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे-
१) सुभाष पांडुरंग चव्हाण
शाळा- न्यू इंग्लिश स्कूल मेखळी
२) राजाराम ज्ञानदेव राजाराम
शाळा- श्री छत्रपती हायस्कूल काटेवाडी
३) सचिन भगवान चव्हाण
शाळा- विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा विद्यानगरी
४) लालासो खंडेराव थोरात
शाळा – वाघेश्वरी विद्यालय निरावागज
५) महेंद्र चंद्रकांत दीक्षित
शाळा- धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल कसबा- बारामती
६) निवृत्ती कुंडलिक बोरावके
टी .सी.कॉलेज बारामती
७) उर्मिला प्रफुल्ल भोसले
शाळा – आर. एन.आगरवाल टेक्निकल इंस्टिट्यूट बारामती
८) रोहिणी हनुमंतराव सावंत
शाळा -उत्कर्ष आश्रम शाळा वाघळवाडी
९) आशिष हनोख कुलकर्णी
शाळा – मिशन हायस्कूल बारामती
१०) सुनील पद्माकर जगताप
शाळा – श्री सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *