बारामती दि. 04 :- बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात
परिवहन आयुक्त कार्यालयातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती साठी मिळालेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे व नंदकिशोर काळे व इतर अधिकारी उपस्थित होते. या वाहनामध्ये स्पीड गन, ब्रीथ ॲनालायझर व टील्ट मीटर बसवीले आहेत. त्यामुळे रोडवरील जादा स्पीडची वाहने तसेच नशा करुन चालवणारी वाहणे पकडण्यास मदत होणार आहे.