पिंपळी: (प्रतिनिधी, गणेश तावरे) बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील सचिन उध्दव शिंदे यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून उसाच्या पाचव्या पिकात भरघोस उत्पादन मिळवले आहे. २०१४-१५ साली त्यांनी उसाचे पूर्व हंगामी हे पिक लावले. त्यावेळेस त्यांनी उसाची १०००१ ही प्रजात लावली. त्यांनी या जातीची ४५०० रोपे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथून विकत आणली होती. रोपांची लागवड त्यांनी एक एकर शेतामध्ये केली. त्यांनी उसाला मळी, शेणखत दरवर्षी टाकले. तसेच विषमुक्त शेतीसाठी फायदेशीर असणारे व जमिनीची सुपीकता वाढवणारे सुपर पॉवर जी प्लस रिच पॉवर आहे. त्यामुळे फुटव्यांची संख्याही वाढते. त्यांना प्रथम वर्षी ५५ टन इतके उत्पादन मिळाले. जमिनीमध्ये झिंकची कमतरता असल्यामुळे कमी उत्पादन मिळाले. झिंकची कमतरता घालवण्यासाठी त्यांनी ‘सेकंडरी मिक्रोन मिक्रोनुत्रीइंट्स (secondary micronutrients) जमिनीवर वापरले.
खोडवा पिक घेतल्यामुळे आंतरमशागत पहिल्या वर्षीच करावी लागते. त्यामुळे मेहनतीची आणि खर्चाची बचत होते. पाचव्या वर्षी त्यांना एका एकर मधून सरासरी ७० ते ८० टन उत्पादन मिळाले.
या यशाचा आढावा कृषी महाविद्यालय,बारामती येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु.दिव्या दत्तात्रय ढवाण या विद्यार्थिनीने घेतला आहे.
यावेळी शेतकरी सचिन शिंदे, मिलिंद शिंदे व उद्धव शिंदे, हरिभाऊ केसकर,मच्छिंद्र पिसाळ,दत्तात्रय ढवाण,सुनिल बनसोडे आदींसह प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.