कृषि कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांची कृषी विज्ञान केंद्रास भेट

प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये महाराष्ट्रातील विविध कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या मुलांना ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत (रावे) कृषी विज्ञान केंद्राशी जोडून दिले आहेत. केंद्राच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती व कार्यअनुभव घेण्यास हे विद्यार्थी येत आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक आठवड्यात सुमारे 150 विद्यार्थी केंद्रामध्ये येऊन विविध विषयातील कार्यानुभव घेत आहेत. त्यांना केंद्रांमध्ये इंडो डच तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये भाजीपाला कलम तंत्रज्ञान व भाजीपाला निर्यात बाबत मार्गदर्शन तसेच जिवाणू खते व औषधे बनवण्याच्या प्रयोग शाळेत खते व औषधे निर्मितीबाबत प्रात्यक्षिके फळ व रोपवाटिकेमध्ये विविध कलम तंत्रज्ञान व रोपवाटिका व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन, गांडूळ खत उत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मुक्त संचार गोठा, मधुमक्षिका पालन इत्यादी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्षात कार्यानुभवतून देण्यात येत आहे. ट्रस्टचे चेअरमन श्री.राजेंद्र दादा पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मार्गदर्शन केले जात आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी संलग्न झाले आहेत कृषी विज्ञान केंद्रामार्फत श्री. संतोष गोडसे विषय विशेषज्ञ कृषी विस्तार तसेच कृषि महाविद्यालय बारामती मार्फत प्रा. संदीप गायकवाड उपप्राचार्य कृषी महाविद्यालय बारामती, प्रा. सौ. आरती भोईटे, प्रा. समीर बुरुंगले, यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *