बारामती दि. 31 :- मौजे मळद येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत 29 ऑगस्ट 2021 रोजी सोयाबिन पिकावरील क्रॉपसॅप योजनेंतर्गत विनाअनुदानित शेतीशाळा पार पडली.

या शेतीशाळे मध्ये शेतकऱ्यांना विविध किड, रोग, कमी पाऊसमान असताना सोयाबिन पिकाची घ्यावयाची काळजी, तसेच कृषि विभागाच्या विविध योजना इत्यादी विषयी माहिती देवून उपस्थित शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. कृषि सहायक सांगळे व काजळे यांनी शेतीशाळेची आवश्यकता व महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी कृषि पर्यवेक्षक पी.जी.शिंदे, जे.एन.कुंभार, मंडळ कृषि अधिकारी सी.के.मासाळ, कृषि सहायक सांगळे , काजळे, मळद येथील प्रगतशील शेतकरी गवारे , एकता बचत गटाचे अध्यक्ष प्रशांत शेंडे, तसेच प्रल्हाद वरे व शेतकरी उपस्थित होते.

या कृषि शाळेचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी, बारामती व तालुका कृषि अधिकारी, बारामती यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *