मनोहर मामाचा .. ऐकला का कारनामा…. मनोहर भोसलेच्या विरोधात पहिला तक्रारी अर्ज दाखल…

इडा पिडा घालवण्यासाठी नावावर करून घेतला 40 लाखाचा बंगला.. तो बंगला परत देण्यासाठी उकळले सात लाख रुपये…

बारामती – तालुक्यातील एका तरुण व्यवसायिकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला असून यात बंडलबाज मनोहर मामा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या तक्रारदाराने म्हटले आहे की २०१५ मध्ये उंदरगावला बाळुमामा अवतरले आहेत असे सांगून लिमटेक ता. बारामती या गावातील काही नातेवाईकांनी मला मनोहर भोसले यांचेकडे घेवून गेले.
उन्हात उभा राहून, कातडी चप्पल घालून, पूर्ण पांढरा पोशाख घातलेला मनोहर भोसले मी बाळु मामाचा अवतार आहे असे सांगुन हातवारे करत भुतकाळात काय घडले आहे हे सांगत होता. तसेच संध्याकाळी आरतीच्या वेळेला स्वत:च्या नावाने आरती व बाळू मामाच्या नावाने चांगभले.. मनोहर मामाच्या नावाने चांगभले.. अशा घोषणा देत त्याठिकाणी ढोल वाजवत असे. मनोहर भोसलेने काठीने मारले व याला भुतबाधा झाली आहे या पाच वार्‍या कराव्या लागतील असे सांगितले त्या नंतर सलग रविवारी पाच वार्‍या केल्या, तसेच तिथल्या लोकांना अन्नदान केले. मनोहर भोसले याला कोणीतरी सांगितले असावे की, महेश आटोळे हे बिल्डर आहेत व त्यांचा माळेगाव बु, ता. बारामती येथे रो-हाऊसेचा प्रोजेक्ट चालू आहे.

जून २०१५ नंतर मनोहर भोसले, विशाल वाघमारे हे मला भेटण्यासाठी येवू लागले, जुलै २०१५ या महिन्यात डायरेक्ट माळेगाव येथील साईटवरती आले व मला म्हणाले माझे व माझे वडीलांचे भांडण झाले आहे मला तुझ्या बांधकामामधील एक रो-हाऊस माझे नावाने करून दे, तुझे सगळे व्यवस्थीत करतो मनोहर भोसले, विशाल वाघमारे, धायतोंडे व इतर दोन या सर्वानी असे सांगितले की, रो-हाऊस जर नावावर करून नाही दिले तर साईट बंद पडेल त्याभितीपोटी मी स्टॅम्प डयुटीची रक्‍कम गोळा करून दि. २०/०८/२०१५ रोजी सबरजिस्ट्रर ऑफीसमध्ये कोणतीही रक्‍कम न घेता साठेखताचा दस्त क. ६७७६/ २०१५ करून दिला. त्यानंतर एका अमावशेला साईटवरती येवून पशुबळी व इतर विधी केले. त्यानंतर गाव गीरीम, ता. दौंड, जि. पुणे मध्ये चालु असलेल्या मठामध्ये बांधकाम चालू केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, चालू बांधकामावरती लक्ष दे व आठवडयातून दोन वेळा भेट तसेच उंदरगावामध्ये भक्तांची संख्या वाढली आहे त्यासाठी शेड बांधायचे आहे, त्यासाठी ५०,०००/ घेतले. उंदरगावामधील राहत असलेल्या घरी वरच्या मजल्यावरती मार्बल टाकून घेतले होते. तसेच किरकोळ कामे करून घेत असे व कोणतीही रक्‍कम देत नसे. मी भितीपोटी सर्व गोष्टी करत असे. काही दिवसानंतर दौंडमध्ये गीरीम येथील मठावरती महिलांशी अश्लिल चाळे तसेच जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असे. हे तेथील पाहुण्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तेथून हाकलून दिले व पोलीसांत तकार केली, त्यामध्ये विशाल वाघमारे याला अटक झाली. त्यानंतर मनोहर भोसले हा काही दिवस फरार होता. माझे रो-हाऊस अडकल्यामुळे मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस वैभव वाघ व तांबे या दोघांनी असे सांगितले की, कोणतीही तक्रार केली तर आम्ही तुला सोडणार नाही. त्यावेळी मी विनंती केली की, लाखो रूपयांचा रो-हाऊस मला देण शक्‍य नाही. तो मला परत करावा त्यावेळेस त्यांनी मनोहर मामांना विचारून सांगतो असे सांगितले. त्यानंतर काही दिवसानंतर असा निरोप आला की, महेश आटोळेची भुतबाधा काढण्यासाठी आठ लाख रुपये माझी फी झाली आहे. ती दिल्यानंतर मी रो-हाऊस रदद करून देतो, पण अट घातली होते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून पाच लाख रुपये रोख घेऊन माझं रो हाऊस मला परत केले.
परंतू माझं चं मला रो हाऊस देण्यासाठी माझ्याकडून पाच लाख रुपये घेतले असल्याची तक्रार संबंधिताने केली आहे..

दरम्यान क्रांतीकारी आवाज संघटनेने मनोहर मामाचा पर्दाफाश केला आहे. बारामतीत अजून अनेक नागरिक आहेत ज्यांच्या जमिनी मनोहर मामा आणि त्याच्या पत्नीच्या नावे आहेत.. जो पर्यंत मनोहर मामा ला अटक होत नाही तो पर्यंत क्रांतीकारी आवाज संघटना याचा पाठपुरावा करणार आहोत तसेच या साठी प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल असे मत संघटनेचे अध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *