संचालक आत्मा,पुणे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे यांची बारामती येथील प्रक्रीया युनिट, पीक प्रात्यक्षिक व नर्सरीला भेट

बारामती दि.30:- संचालक आत्मा, पुणे किसनराव मुळे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ज्ञानेश्वर बोटे यांनी बारामती येथील विविध प्रक्रिया युनिट, विविध पिक प्रात्यक्षिकाची व नर्सरीची 26 ऑगस्ट 2021 रोजी पाहणी केली.

रमेश साळुके हे स्वत: बटाटा वेफर्स, केळी वेफर्स, चना डाळ, फरसान, चिली-मिली, खारी बुंदी, लसुण शेव, शेव इत्यादी प्रकारचे प्रक्रिया केलेले पदार्थ सहा भट्ट्यातून तयार करून स्वत:च्या लक्ष्मी फरसान, प्रतिक फरसान, साई, त्रिमुर्ती,गणेश व साळुंखे बंधु या नावने विक्री करून अंदाजे तीन हजार टन बटाटे व दिड हजार टन केळीचे वेफर्स तयार करून स्वत: विक्री करतात.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत चंद्रकांत काळे व हनुमंत कदम, माळेगांव, खुर्द यांनी त्यांच्या शेतात केलेल्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. तसेच माळेगांव खुर्द येथील प्रशांत काटे यांनी सन 2017 मध्ये लागवड केलेल्या खजूर फळपिकाची पाहणी केली व त्यातील बारकावे जाणून घेतले. काटे यांना या वर्षी प्रथमच खजूर उत्पादन मिळाले असून त्यांनी 100/- रूपये प्रति दराने याची विक्री केली. काटे यांच्या तुकाई ऊस नर्सरीची देखील पाहणी यावेळी करण्यात आली व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक नेमाजी गोलांडे, कृषि सहायक कोमल भानवसे, प्रगतशील शेतकरी आप्पा काळे, शेतकरी बांधव उपस्थित होते.

या सर्व पाहणी दौऱ्याचे नियोजन कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक नेमाजी गोलांडे, कृषि सहायक कोमल भानवसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *