बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी नसल्याने कोविड नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखताना देखील अडचण आहे. बारामती तालुक्यातील नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्येपेक्षा कित्येक पटीने जास्त असताना देखील बारामतीत मुख्याधिकारी नसणं हि लाजिरवाणी बाब आहे.
बा.न.पच्या उपमुख्याधिकारी कसलीही जबाबदारी न घेता सरळ नागरिकांना सांगतात की तुम्ही जाऊन प्रांत साहेबांना भेटा. नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ते पण काम टाळत आहेत व मुख्याधिकारी नसल्याचे कारण पुढं करत प्रत्येक काम टाळलं जात आहे. बारामतीत नगरपालिकेला मुख्याधिकारी नियुक्त होण्यास विलंब का लागतो असा देखील प्रश्न लोकांना पडला आहे.
यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, बारामती तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, स्वप्नील मोरे, प्रवीण धनराळे, अमोल गालिंदे, भार्गव पाटसकर उपस्थित होते