प्रतिनिधी- डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसाहत याठिकाणी घरकुल योजनेचे भूमिपूजन मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, शहराध्यक्ष इम्तियाजभाई शिकीलकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटनेते सचिन सातव, उपगटनेत्या सविता जाधव, महा हौसिंगचे काटकर साहेब, हनूमंत पाटील, नगरसेवक राजेंद्र बनकर, संजय संघवी, नवनाथ बल्लाळ, सुधीर पानसरे, गणेश सोनवणे, अभिजीत चव्हाण, दिनेश जगताप, नगरसेविका निता चव्हाण, अनिता जगताप, सुहासिनी सातव, सिमा चिंचकर, आरती शेंडगे, वैष्णवी गायकवाड तसेच आप्पा अहिवळे, धनंजय तेलंगे, बापू शेंडगे, गजानन गायकवाड, सतिश खुडे, सुरेश शेलार, निलेश जाधव, उमेश शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ व बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत २७६ घरे व २९ व्यवसायिक गाळे असा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सुचना केल्या की चांगल्या व उच्च दर्जाची इमारत जलद गतीने झाली पाहिजे, लवकरात लवकर लार्भात्याना घरकुल योजनेचा लाभ मिळावा. जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी ही योजना राबविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून डाॅ बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे पुनर्वसनाचे काम मार्गी लावले, सर्व लाभार्थ्यानी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे स्वागत स्थानिक नगरसेविका मयुरी सुरज शिंदे व बिरजू मांढरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *