प्रतिनिधी – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण तरुणीच्या हाताला काम मिळावे.तसेच स्वयम् रोजगार निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग व्यवसायाचे बँकेचे व्याज परतवा देऊन महामंडळ सहकार्य करत आहे.
यामधून जवळपास २५,००० च्या वर युवक युवतींनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु लाभार्थी संख्येची आकडेवारी लक्षात घेता खालील बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे
काही प्रलंबित होल्ड प्रकरणे याबाबत योग्य मार्गदर्शन करून ते मंजूर करण्यात यावे,व्याज परतावे त्वरित व लवकरात लवकर मंजूर करून घेऊन लाभार्थी यांच्या खात्यावर पाठविण्यात
यावे,जिल्हा समन्वयक यांना कार्यालयीन वेळेतील फोन,एसएमएस, मेल यांना प्रतिसाद देणे बंधनकारक करणे,लाभार्थी संख्या वाढण्याची आकडेवारी लक्षात घेता अधिकारी वर्गाची संख्या वाढविण्यात यावी,मराठा विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात यावी,महामंडळाच्या मागणीनुसार निधीची तरतूद करण्यात यावी या विविध विषयासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच कौशल्य विकास विभागाचे प्रमुख तुषार जगताप यांनी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *