बारामती : मासाळवाडी ता.बारामती येथील होमगार्ड प्रशांत गोरे यांचा रविवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन च्या दिवशीच आकस्मित निधन झाले होते. प्रशांत यांची परिस्तिथी अत्यंत हलाखीची होती. ज्या दिवशी होमगार्ड चे काम नसेल तेव्हा प्रशांत हे त्यांचा पिडिजात व्यवसाय,ब्रास बँड चे काम करत असत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमामुळे लग्नसराई बंद असल्याकारणाने त्यांचा हा व्यवसाय बंद होता. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. व प्रशांत यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते; व त्यांना एक लहान मुलगी पण आहे.
प्रशांत यांची हालाखीची परस्थिती लक्षात घेता,माणुसकी च्या नात्याने बारामती होमगार्ड यांनी एकोणसाठ हजार एकशे एक (५९,१०१ ₹) रुपयांची मदत प्रशांत गोरे यांच्या कुटुंबियांना रोख रक्कम स्वरूपात मदत केली. यावेळी प्रशांत च्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
या कामी बारामती तालुक्याचे होमगार्ड समादेशक मा.जनकराज सोनवणे, होमगार्ड संदीप कसबे, वैभव तावरे, भारत शिंदे, फुलाजी थोरात, प्रदीप थोरात, संदीप थोरात, पारसे व बारामतीतील सर्वच होमगार्ड जवान व महिला होमगार्ड यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *