ग्रामीण भागातील युवक व युवतींना कृषी व कृषीपुरक व्यवसाय विषयक प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि.२६:- पुणे जिल्हयातील ग्रामीण युवक / युवतींना कृषि विज्ञान केंद्र, बारामती, नारायणगाव, तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक / सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधुन त्वरीत नोंदणी करण्याचे आत्माचे प्रकल्प संचालक यांनी आवाहन केले आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण -२०१५ अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे हा कार्यक्रम राबविणेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील युवकांना / महिलांना स्थानिक गरजेनुरुप कृषि व कृषि पुरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देणेसाठी तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण देणे हा कार्यक्रम राबविणेत येत आहे.

 प्रशिक्षणाचा कालावधी ७ दिवसाचे (६+१ प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी करीता प्रवास), प्रशिक्षण वर्ग क्षमता १५ प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग, (कृषि व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सुचनानुसार विशेष घटक योजनेंतर्गत अनु. जाती-४, अनु.जमाती-३ व उर्वरित सर्वसाधारण घटक-८ या प्रमाणात युवकांची निवड करण्यात येणार आहे)

सन २०२१-२२ अंतर्गत पुणे जिल्हयासाठी वरील निकषांनुसार दोन प्रशिक्षण कार्यक्रमांस मंजुरी मिळालेली आहे व नोडल प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आलेली आहे.

प्रशिक्षण संस्थेचे नाव कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, कौशल्य
प्रशिक्षणाचा विषय मधुमक्षिकापालन,
प्रशिक्षण कालावधी माहे सप्टेंबर २०२१,
कृषि विज्ञान केंद्र, बारामती, मधुमक्षिकापालन
माहे ऑक्टोबर २०२१ असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *