प्रतिनिधी- मौजे जराडवाडी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ज्वारी पिकाची क्राॅपसॅप अंतर्गत शेतीशाळा घेण्यात आली. यामध्ये आजचा लघु अभ्यास मध्ये जमीनीची जलधारण क्षमता तपासणे याचे प्रात्यक्षीक करण्यात आले. यासाठी तीन पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर केला. त्यामध्ये एका बाटलीत खतमिश्रीत माती ,दुसरी बाटलीत काळी माती व तिसरीत वाळू मिश्रीत माती घेऊन सर्व बाटलीत समान पाणी ओतले व त्यामधून खाली येणारे पाणी याचे निरीक्षण करून मोजले. यामध्ये वाळू मिश्रीत मातीतून जास्त पाणी आले यावरून त्या मातीची जलधारण क्षमता कमी आहे हे समजले व चित्रीकरण मध्ये लमीत कसे तयार करावे याचा चार्ट तयार केला व वंदना जराड यांनी तो सादर केला. यावेळी सरपंच गावातील महीला शेतीशाळेस हजर होत्या . शेतीशाळेचे नियोजन कृषी सहाय्यक माधुरी पवार यांनी केले.