प्रतिनिधी – स्मार्ट संस्था दिल्ली, युनिसेफ आणि वसुंधरा वाहिनी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने १३ सप्टेंबर पासून Vaccine Hesitancy Campaign राबवले जात आहे. या अभियानामध्ये डॉ. चंद्रकांत पिल्ले यांनी लसीकरणाविषयी समाजामध्ये असलेले गैरसमज दूर केले याविषयीचे narrowcasting सूर्यनगरी बारामती येथे रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी घेण्यात आले. या कार्यक्रमांसाठी परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये कवी हनुमंत चांदगुडे यांनी कविता सादर केल्या. तर बाल कवी केशव शत्रुघ्न बेलदार याने लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यावर स्वलिखित कविता सादर केली.
लसीकरणा विषयी लोकांच्या मनामध्ये असलेले गैरसमज, भीती, अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त माननीय सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी केले. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडवोकेट अशोक प्रभुणे, सचिव अॅडवोकेट निलिमाताई गुजर, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, तसेच व्ही.आय. आय.टी चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाची प्रस्तावना वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ. आशा मोरे यांनी केली. संगीत शिक्षक श्री अभिजित पालकर यांनी सूत्र संचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. सुजाता वाबळे, वसुंधरा वाहिनीच्या आर.जे. स्नेहल कदम व ऋतुजा आगम, चेतन धुमाळ, यांनी सहकार्य केले. हिरकणीचे श्री अक्षय साबळे व सौ रेश्मा साबळे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.