खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या
भिगवण (प्रतिनिधी) – दिनांक २४ मे २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भिगवण पोलीस स्टेशनचे फोनवर माहीती मिळाली की, मौजे भादलवाडी गावचे हददीत निरा भिमा नदी जोड प्रकल्प येथील डंपिंग यार्डमध्ये टाकलेल्या दगडयांच्या ढिगाऱ्यावर एक अनोळखी पुरुषचा मृतदेह पडलेला आहे. अशी माहीती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार (सहा. पोलीस निरीक्षक) यांनी तात्काळ पोलीस स्टाफ यांना मदतीस घेवुन घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी अनोळखी पुरूष इसमाची मयत बॉडी ही अतिशय निघृणपणे गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. प्रथम सदर अनोळखी मयताची ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे असताना पोलीसांनी अत्यंत कसोशिने व चिकाटीन मयताची ओळख पटवुन त्याचे नाव महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४ वर्ष, रा. रावणगाव, एरीगेशन कॉलनी, कांबळेवस्ती, ता. दौड, जि पुणे) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्याचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण याने त्याचा भाऊ महेश दत्तात्रय चव्हाण याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने गळा चिरून खून केला म्हणून तकार दिली. त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर २०९/२०२१ भा.द.वि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास चालु केला.
सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हा घडले ठिकाण हे निर्जनस्थळ असल्याने सदर ठिकाणी गुन्हा घडकीस येणेचे दृष्टीने कोणतेही धागेदोरे व पुरावा नसताना दिलीप पवार (सहा. पो. निरीक्षक) यांनी तात्काळ तीन टिम तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केल्या.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे यातील मयत महेश दत्तात्रय चव्हाण, याची पत्नी हिचे तिचे गावातील घराचे शेजारी राहणारा इसम नामे अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे (वय २१ वर्ष, रा. अकोले, समाज मंदिरा शेजारी, ता. इंदापुर, जि. पुणे) यांचे सोबत पूर्वी पासुन प्रेम संबंध असल्याची माहीती मिळाली. त्या अनुशांने मयत याची पत्नी हिचा प्रियकर अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे, (रा.अकोले ता.इदापुर, जि. पुणे ) यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला. त्यावेळी त्यास विश्वासात घेवुन पोलीस खाक्या दाखविताच त्याने माझे महेश याची पत्नी हिचे सोबत प्रेमसंबंध होते. मयत महेश याचे मुळे मला माझी प्रियसी हिला भेटता येत नव्हते. त्यामुळे त्याचे मनामध्ये मयत महेश याचे बदल राग निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने त्याचा चुलत भाऊ गणेश हनुमंत शिंदे यास मदतीस घेवुन महेश याचा काटा काढण्याचे नियोजन केले. गणेश शिंदे याचे पण मनामध्ये महेश याचे बाबत राग होता. कारण गणेश याची पत्नी हिने पण गणेशला घटस्फोट दिला होता, तो घटस्फोट महेश याने त्याचे नातेवाईकांना सांगितल्यामुळे दिला होता. असा गणेश शिंदे याचा पण समज झाला होता. त्यामुळे तो पण महेश याचेवर चिडुन होता. त्यामुळे अनिकेत शिंदे व गणेश शिंदे हे दोघे एकत्र येवुन त्या दोघांनी प्लॅनींग करून दिनांक २३/०८/२०२१ रोजी रात्री १०:०० वा. चे सुमारास अकोले येथुन गप्पा मारण्याचे बहान्याने त्याच्या घरा पासुन थोडे अंतरावर असलेल्या निरा भिमा नदी जोड प्रकल्पाचे बोगदया जवळी डंपिंग यार्ड येथे निर्जन स्थळी नेवुन त्याचा धारदार कोयत्याने गळा कापुन खुन केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हा आरोपी नामे १) अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे (वय २१ वर्ष), २) गणेश हनुमंत शिंदे (वय २८वर्ष) दोघे रा. अकोले, समाज मंदीरा शेजारी, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी इंदापुर न्यायालय यांचे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. त्यांना ६ दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मिलिंद मोहीते उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षकस्थानिक गुन्हे शाखा, अशोक शेळके , यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार ( सहा. पोलीस निरीक्षक), सुभाष रूपनवर (पोलीस उपनिरीक्षक), विनायक दडस पाटील(पोलीस उपनिरीक्षक), पोलीस अंमलदार नाना वीर, विठठ्ल वारगड, समीर करे, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, महेश माने, संदीप पवार, विजय लोढी, अंतुल पठाण, पालसांडे, भांडवलकर, अंकुश माने, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार अभिजीत एकशिंगे, अनिल काळे, रवीराज काकरे यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकिस आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.