प्रतिनिधी – सोशल मीडियामुळे कोणाचं आयुष्य कधी, कसं बदलल हे काहीच सांगता येत नाही. हे जेवढं घातक आहे तेवढेच फायदा देणारही आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला क्षणातच झिरो करणारं सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीला तेवढ्याच ताकदीने हिरो सुद्धा बनवतंय. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. अशीच एक हि बातमी वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
बारामती तालुक्यातील सांगवी येथील लंगोटे आण्णा.. वय वर्ष 97….ना शिक्षण.. ना नोकरी… अचानकच प्रसिद्धीच्या झोतात आले आणि चक्क एका महिन्यात इंस्टाग्राम चे स्टार झाले. याबाबत सविस्तर बातमी अशी की जहिर शेख आणि शेखर तावरे यांनी सुरू केलेले लंगोटे आण्णा ऑफिशियल हे इंस्टाग्राम वरचे पेज जर तुम्ही आत्ता पाहिले तर त्यावर 100k फॉलोवर्स तुम्हाला दिसतील. अशिक्षित-अडाणी गावाकडचा गडी. साधा पोशाख, गांधी टोपी आणि एक हि दात नसल्याने त्यांच्याकडे पाहून सतत हसमुख चेहरा हे प्रथम दर्शनी दिसतं. म्हाताऱ्याची बोलण्याची लखब, बोलीभाषा आणि ती एक शिवी यामुळे चक्क आज ते तरुणांच्या काळजात उतरले आणि स्टार झाले. पूर्वी लंगोटे अण्णा यांना जवळ करत नव्हते, आज त्यांच्याबरोबर सेल्फी घ्यायला झुंबड लागली आहे. भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि मग भेटावे लागते. फक्त एक शिवी दिली, पण शिवी देण्याची लखब, ती भाषा, आण त्यो गावरान मिजास, भन्नाट पोशाख यामुळे शिवी कानातून डोक्यात अन डोक्यातुन थेट काळजात जातीय. सध्या ही म्हातारं जरा फार्मातच हाय…. दररोज नवा कुर्ता, स्टाईलबाज गॉगल आणि शिव्या खायला गोळा होणारी दररोजची माणसं… लंगोटे अण्णा अशिक्षित असल्यामुळे त्यांचे इंस्टाग्राम जहीर दादा शेख चालवत असून त्यांना इतर मदत ही त्यांच्या मार्फत होत आहे. जहीर दादा शेख व शेखर आप्पा तावरे यांनी सर्व खर्च उचलत संपूर्ण गावांमध्ये आधी अण्णा ला फेमस केला आणि मग आता समदया इंस्टाग्रामवर अण्णा जाळ अन धुर काढतोय.
अण्णा ला उद्घाटनाला बोलावलं जाऊ लागला आहे. अनेक लोक पैशांची मदत करत आहेत. उद्या अण्णा एखाद्या चित्रपटात दिसलं तर नवल वाटायला नको. मराठी भाषाच आहे जाम भारी… शिव्या देऊन पण फेमस होतंय कारभारी….