प्रतिनिधी – वातावरणातील होणारे बदल व संभाव्य परीस्थितीचा यशस्वी सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ज्ञान व तंत्रज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे यांचेतर्फे क-हावागज व नेपतवळण परिसरातील शेतकरी यांच्या एक दिवसीय अभ्यास दौ-याचे नियोजन “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटीक स्ट्रेस मॅनेजमेंट(NIASM)माळेगाव” येथे करण्यात आले.
क-हावागज व नेपतवळण परिसरातील जवळपास 25 शेतकरी उपस्थित होते, सदर अभ्यास दौऱ्या दरम्यान केंद्र शासनाच्या “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटीक स्ट्रेस मॅनेजमेंट (NIASM) माळेगांव” च्या संस्थेने विकसित केलेले Integrated Farming सिस्टिम (एकात्मिक शेती पध्दती) मध्ये (1000 sq ft) वातावरणात होणाऱ्या बदलांमध्ये शेती व्यवसाय कशाप्रकारे शाश्वत करता येईल याचे मॉडेल डॉ. यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक दृष्टीने मार्गदर्शन केले, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी तेथील मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, पशुपालन, बारमाही तूर उत्पादन, ड्रॅगन फ्रुट लागवड प्रकल्पला भेट दिली. सदर दौऱ्यामध्ये NIASM चे डॉ.संजीव कोचेवाड, डॉ.मुकेश भेंडारकर, यांनी मार्गदर्शन व तांत्रिक ज्ञान दिले.
कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक पिसे एस पी यांनी केले. कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी श्री यमगर, कृषि पर्यवेक्षक श्री. पवार, श्री. जाधव व नियमचे श्री डॉ. विजय काकडे यांनी केले.
कार्यक्रमास श्रीमती. आडके, कृषि सहाय्यक अंजनगाव, पांडुरंग नाळे, अनिल नवले, गणेश धोत्रे, निलेश धाडगे, प्रशांत बनकर व इतर शेतकरी उपस्थित होते.