प्रतिनिधी – ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बायर फाउंडेशन इंडिया आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कार्बन ॲक्शन अँड री न्यूड अर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ४ आणि ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी डॉ. हिमांशू पाठक, संचालक, ICAR-NIASM, Baramati. यांनी मातीचे आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. डॉ सुहास जोशी ( हेड सस्टेनेबिलिटी अँड बिझनेस सेटवर्डशिप , साऊथ एशिया.), डॉ संतोष भोसले ( ॲडव्हायझर, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कार्बन ॲक्शन अँड री न्यूडअर्थ.) श्री वेदांत अहलुवालिया आणि श्री राजेंद्र शर्मा (ॲडव्हायझर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कार्बन ॲक्शन अँड री न्यूड अर्थ. श्री चंद्रशेखर भडसावळे ( इनोव्हेटिव्ह फार्मर ऑफ इंडिया.), श्री राजकुमार (शास्त्रज्ञ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट.),डॉ विवेक भोईटे ( विषय विशेषज्ञ मृदा शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती) यांनी या प्रकल्पाविषयी सादरीकरण केले. त्यावेळी ” एसआरटी तंत्राचा उपयोग करून एकूण १७८ प्रक्षेत्रावर सदरचे तंत्रज्ञान वापरून सर्वसाधारण प्रति गुंठा ८५ किलो उत्पादन घेतले आहे. सात तालुक्यातील १९० शेतकरी या अभियानात सहभागी झाले. या तंत्राचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये जालिंदर शिर्के, संभाजी खोपडे , दिनकर सातकर, संदीप नांगरे, या शेतकरी बांधवांचा समावेश होता .