पैश्याने भरलेलं हरवलेलं पाकीट प्रामाणिक पणे केले परत : विजय भिसे यांचे परिसरात कौतुक

प्रतिनिधी : दिपक वाबळे देऊळगाव रसाळ , बारामती सोमवार दिनांक 06 डिसेंम्बर 2021रोजी सकाळी देऊळगाव रसाळ येथील विजय प्रल्हाद भिसे यांना प्रवास करताना एक पाकीट सापडले त्यामध्ये आधारकार्ड , पॅनकार्ड , ए टी एम कार्ड , काही रोख रक्कम त्यामध्ये होती . विजय भिसे यांनी त्यातील कागदपत्रे पाहिल्यावर अंजनगाव येथील संदेश वायसे यांचे आहे असे समजल्यावर त्यांनी अंजनगाव मधील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद मोरे यांच्याकडून संदेश वायसे यांचा मोबाईल नंबर घेऊन फोन केला व त्यांना पाकीट सापडल्याची माहिती दिली. थोड्या वेळात संदेश वायसे यांनी देऊळगाव रसाळ येथे येऊन पाकीट घेतले व विजय भिसे यांचे आभार मानले. त्यावेळी उपस्थित सुपे पोलीस स्टेशन चे श्री. साळुंके व श्री. दरेकर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *