तेजपृथ्वी ग्रुप यांच्या वतीने कोविड योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ, बारामती, तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने रविवार दिनांक 05 डिसेंम्बर 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता बारामती येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय जुना मोरगाव रोड , बारामती या ठिकाणी कोविड योध्दा पुरस्कार 2020 – 2021 चे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी बारामती तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व आरोग्यमित्र , सामाजिक संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांना सन्मानित करण्यात आले.

तेजपृथ्वी ग्रुप चे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री राहुल रामचंद्र नाकाडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वेलनेस चेकअप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे , पुणे जिल्हा बँकेचे संचालक श्री. मदननाना देवकाते , इंदापूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती श्री. पांडुरंग तात्या मारकड , डॉ. रमेश भोईटे , डॉ. बापू भोई , श्री. शेवंतीलाल जोशी , सौ. अनिताताई खरात , अनिल जाधव , श्री. श्रीमंत घोडके , सौ. स्वाती धायगुडे , सौ. अमृता वाकचौरे , सौ. शिलाताई पवार , श्री. नानासाहेब खरात , श्री. गोरख थोरात , श्री. किरण गाजरे , श्री. गणेश खंडागळे , श्री. अर्जुन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *