प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
शुक्रवार दिनांक 03 डिसेंबर 2021. बारामती तालुक्यातील जिरायत भागातील सुपे , दंडवडी , नारोळी , कोरोळी , देऊळगाव रसाळ , कारखेल , खराडेवाडी , उंडवडी सुपे , सोनवडी परिसरातील शेतकरी 1 डिसेंम्बर व 2 डिसेंम्बर रोजी अचानक हवामानातील झालेला बदल आणी झालेला मुसळधार पाऊस याने हवालदिल झाला आहे.
पावसाने कांदा , मका , ऊस , गहू , हरबरा , ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे , परिणामी बळीराजा धास्तावला आहे. अक्षरशः पिके भुईसपाट झाली आहेत , पावसाने कहरच केला आहे .
या वर्षी पाऊस आणी रोगट हवामानाचा परिणाम कांदा या पिकावर जास्त प्रमाणात झाला आहे , त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे , या वर्षी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नाही असे चित्र आहे , पावसाने शेतातून पाणी वाहू लागले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
त्यामुळे कृषी विभागाने पाहणी करावी असे मत देऊळगाव रसाळ येथील शेतकरी नंदकुमार वाबळे , पांडुरंग वाबळे , आनंद रसाळ , दत्तात्रय वाबळे , बाळासो बागल , नितीन सपकळ , आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.