प्रतिनिधी – सध्या आफ्रिकेतील ओमिक्रोन कोरोना व्हायरस आफ्रिकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन गाइडलाइन्स सुरू केलेले आहेत. या गाईडलाईन्स मध्ये सर्वांनी सामाजिक आंतर पाळणे, तसेच तोंडावर मास्क लावणे हे बंधनकारक आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर मास्क संबंधित कारवाई पोलिसांनी कमी केली होती. परंतु शासनाच्या नवीन गाईडलाईन आल्याने बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे विना मास्क फिरणाऱ्यां वर कारवाहीसाठी विशेष मोहीम व नाकाबंदी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. सर्व लोकांना विनंती करण्यात येते की आपण घराबाहेर पडताना बाजारात फिरताना कार्यक्रमाला जाताना तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे. आपण जर विना मास्क घराबाहेर रोडवर दुकानात मोटरसायकलवर कार मध्ये दिसून आल्यास आपल्यावर मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पाचशे रुपये दंडाची पावती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिली आहे.
आज इंदापूर चौकामध्ये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सपोनि पालवे, पीएसआय जाधव व सर्व स्टाफ यांनी चार ते सहा वाजेपर्यंत नाकाबंदी सुरू केली होती. 20 लोकांवर अद्यापपर्यंत कारवाई झालेली आहे. ही कारवाई बारामती शहरांमध्ये यापुढेही सतत सुरू राहणार आहे. तरी सर्व तमाम बारामतीकर व आसपास परिसरातील लोकांना विनंती आहे की आपण विना मास्क घराबाहेर पडू नका व पोलिसांना कारवाईमध्ये सहकार्य करा असेही यावेळी सांगण्यात आले आहे.