प्रतिनिधी – उज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठान जळगाव सुपे, ग्रामपंचायत जळगाव सुपे व बुधराणी हॉस्पिटल पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशीनिमित्त जळगाव सुपे या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जळगाव सुपेच्या सरपंच कौशल खोमणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उज्वल आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, सामाजिक कार्यकर्ते मोहन खोमणे, युवा कार्यकर्ते वैभव जगताप तसेच बुधराणी हॉस्पिटलचे वैभव गावडे यांनी शिबिरातील लोकांची तपासणी केली. यावेळी 80 लोकांनी डोळ्याची तपासणी केली. त्याचप्रमाणे 23 लोकांना मोफत ऑपरेशन साठी पाठवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्थित होते.