प्रतिनिधी – पिढीतांचे दुःख कमी होण्यासाठी जो स्वतः कसलीही अपेक्षा विना काम करतो अश्या समाज सुधारकांना आपल्या सहकार्यची गरज आहे, श्री.रविंद्र कोल्हे यांनी सन 1988 मेळघाटातील आदिवासी कुपोषित मुलांच्यासाठी मातीशी नाळ धरून काम करण्यास सुरुवात केली आज सुगंध देशातच नव्हे तर तो संपूर्ण जगात दरवळला. त्यावेळी कसलेही सुखसुविधा नव्हत्या सगळी कडे डोळ्यासमोर अंधार होता परंतु अनेक अडचणींना सामोरे जात प्रत्येक दुःखी पेशंटवर इलाज करतानत अन्याय विरुद्ध गांधीवादी लढाई ऊभी करनारे पद्मश्री. रविंद्र कोल्हे व पद्मश्री. स्वाती ताई कोल्हे या मेळघाटातील आदिवासी साठी स्वताच आयुष्य वाहुन घेतले आहे. आज आदिवासी पारधी समाजातील व गरीबीतुन संघर्ष करना-या नामदेव भोसले यांनी डॉ रविंद्र कोल्हे यांची भेट घेतली,
यावेळी श्री कोल्हे यांनी नामदेव यांच्या कामाचे कौतुक केले. ते
म्हणाले की मी भोसले चे काम हमेशा पाहतो ज्या समाजामध्ये शिक्षणाची ओळख नाही, अशिक्षितपणा व त्याच्यातील अनिष्ट ऋढीपरंपराना कुरवाळुन जंगल व्यवस्थेमध्ये शिकारीवर आपले पोट भरणारे, व ज्यांच्याकडे कलंकित नजरेन पाहिले जाते, अशा आदिवासी पारधी समाजामध्ये अहोरात्र निस्वार्थी काम करत असणारे पारधी समाजातील तरुण समाज सेवकाशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे, स्वताकडे काही नसताना देखील गेले वीस ते एकवीस वर्ष ते एक निष्ठेने विवीध क्षेत्रात आदिवासीसाठी काम करत आहेत त्यांनी लिखाणाद्वारे शिक्षण, गरीब, पिढीतांचे दुःखा विषयी वाचा फोडत पारधी समाची भाषा व अनिष्ट ऋढी परंपरा मोडित काडत “मराशी”व “ये हाल, या पुस्तकाच्या लेखनातून लोकांपर्यंत पोचवले व त्याचे महत्त्व समाजात पटवून देत दशकातील अनेक आदिवासी समाजाच्या समस्यांवर मात करून नामदेव यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले , अनेक शासकीय सवलती त्या गरीब कुटुंबाला मिळवून दिल्या, अशिक्षित पणाच्या डोहातून बाहेर काढत प्रत्येक कुटुंबापसी व तांडेन वर जाऊन त्यांच्या मनातील भीती दूर करून हजारो कुटुंबाला न्याय मिळवून देत स्थायिक केले, हेच त्यांचे काम कौतुकास्पद आहे, आज नामदेव भोसले यांच्या या कामांमुळे आम्हाला आमचे सुरुवातीचे दिवस आठवतात असे मत डॉ रविंद्र कोल्हे यांनी वेक्त केले ते पुढे म्हणाले की संघर्षाच्या फुपाट्यातून चालताना अंगावर कलंकित चिखल उडतो त्याकडे लक्ष न देता काम करत राहिले की मनातील पाहिलेला स्वर्ग निश्चितच आपल्यालाला दिसतो. असे मत पद्मश्री रवींद्र कोल्हे म्हणाले, यावेळी पद्मश्री. स्वातीताई कोल्हे म्हणाल्या की सुखद झोका हा मनाने झुलत नसतो तो हलवावा लागतो तरच खऱ्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजतो, आयुष्यात जो कोणी संघर्षाशी लढतो दुःखात हजारो काटेरी पांजरासी संघर्ष करत पुढे येतो तोच खरा या समाजाचा सेवक ठरतो अशा शब्दात नामदेव च्या कामाचे कौतुक सौ.कोल्हे यांनी केले, आज देखील स्वातीताई कोल्हे ह्या स्वतःची पर्वा न करता काटेरी पांजरावर अनवाणी पायाने फिरत गरीब कुटुंबांना मदत करतात व नामदेव भोसले यांच्यासारख्या गरिबीतून काम करणाऱ्या लोकांना अन्याय विरुद्ध लढण्यास साथ देतात, तसे म्हणले तर भोसलेना केंद्र शासनाने,महाराष्ट्र शासनाने, गृह विभाग, व महसूल विभाग, राज्यातील शासकीय संस्था, व पुढारलेल्या संस्थांनी, उद्योगपतींनी, आपल्या पातळीवर विचार करून नामदेव भोसले यांच्या संघर्षमय वाटचालीचे निस्वार्थी काम पाहून त्यांच्या या कामांमध्ये त्यांच्या शेवराई सेवाभावी संस्थाला मदत करणे काळाची गरज आहे, मला वाटते असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले..
या वेळेस पद्मश्री रविंद्र कोल्हे व पद्मश्री,स्वाती ताई कोल्हे यांच्या निवास्थानी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले, ऊरळी कांचन ग्रामपंचायतचे माजी सदस्य मा.राजेंद्र टिळेकर , मा.सचिन टिळेकर , विषाल भोसले यांना सन्मानित करण्यात आले या वेळी हे सर्व एकत्र उपस्थित होते.