बारामती:- 24 ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय बारामती यांच्यातर्फे गुणवडी येथील आमोल गावडे यांच्या शेतात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषि सहायक एम.के. काजळे व सागर चव्हाण यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाचटाची उपलब्धता, पाचट ठेवण्याचे फायदे, पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे, पाचट कुजविण्याची प्रक्रिया याविषयीही त्यांनी माहिती दिली.
यानंतर भवानीनगर साखर कारखान्याचे कृषि अधिकारी प्रविण कांबळे यांनी ऊस खोडवा व्यवस्थापन कसे करावे याविषयी व कृषि पर्यवेक्षक जे.एन. कुंभार यांनी कृषी विभागाच्या योजनाविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी माळेगाव सहकारी कारखान्याचे संचालक जी.बी गावडे, छत्रपती सहकारी कारखाना भवानीनगरचे संचालक राजेंद्र गावडे, माळेगाव कारखाण्याचे व्हाईस चेअरमन नानासो गावडे तसेच मोर्पाचे अध्यक्ष प्रल्हाद वरे व प्रगतशील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.