प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ , बारामती
बुधवार दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी बाबुर्डी येथे नेहरु युवा केंद्राच्या वतिने घेण्यात आलेल्या कँच द रेन उपक्रम या कार्यक्रमामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नेहरू युवा केंद्र पुणे. (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) कँच द रेन अभियान बारामती तालुका अंतर्गत बाबुर्डी येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये पावसाचे पाणी आडविण्याचे महत्व व जलसंधार याविषयी व्याखानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पानी फाउंडेशन बारामती तालुका समन्वयक मा.पृथ्वीराज लाड यांचे व्याख्यान झाले, यावेळी प्रमुख उपस्थितीत बाबुर्डी सरपंच मा. ज्ञानेश्वर पोमणे होते, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोहर खोमणे होते.यावेळी मा.गजानन लोणकर. बारामती तालुका भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.कुलदीप पिंगळे, जेष्ठ शिक्षक मा.आप्पासो पोमणे व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचालन मा.अमोल पोमणे यांनी केले तर प्रस्तावीक नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर यांनी केले तर आभार धिरज वायाळ यांनी मानले.