प्रतिनिधी – स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने वय ३० वर्षे रा शेळगाव ता इंदापूर जि पुणे यास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे एक काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची विना नंबर असलेली मिळून आली. त्यास गाडी चे कागदपत्र बाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता १) एक हिरो होंडा स्प्लेडर मोटार सायकल कीं रु: २०,००० २)एक हिरो होंडा स्प्लेडर मोटार सायकल कीं रु: २०,००० 3) एक हिरो होंडा शाईन मोटारसायकल कीं रु:२०,००० ४) एक हिरो होंडा पॅशन मोटारसायकल कीं रु : २०,००० ५) एक बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल कीं रु:२०,००० असा एकूण १लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने यास वालचंदनगर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरील कारवाई ही मा पोलिस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पो उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहा पो फो अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा अभिजित एकशिंगे, पो हवा विजय कांचन, पो हवा अजय घुले, पो ना स्वप्नील अहिवळे, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.