प्रतिनिधी- मौजे गिरीम ता. दौंड येथे खोडवा ऊस उत्पादन तसेच ऊस पाचट व्यवस्थापन अभियानाअंतर्गत प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम श्री डॉक्टर संदीप भोंगळे यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित केलेला होता. कार्यक्रमासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री मोहन भोंगळे, बाळू तांबे तसेच प्रगतशील शेतकरी दादा भाऊसाहेब लोणकर , सचिन अर्जुन भोंगळे, भगवानराव जाधव , बहुजन मुक्ती मोर्चा चे अध्यक्ष श्री गोरख फुलारी,उत्तम फुलारी तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास आत्मा योजनेचे तालुका समन्वयक श्री महेश रुपनवर यांनी खोडवा व्यवस्थापन व ऊस पाचट व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन बुडके छाटणे, पाचट योग्य पद्धतीने पसरविणे, रा. खते व जिवाणू खते देण्याची पद्धत याबाबत माहिती दिली. दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे श्री उमेश अवचर तसेच संजय जगताप यांनी कारखान्याच्या विविध खतांच्या तसेच जिवाणू कल्चर प्रॉडक्ट बाबत माहिती दिली. कृषी सहाय्यक श्री. वाय टी तडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.