प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत तालुका कृषी अधिकारी दौंड व मंडळ कृषी अधिकारी राहू यांचे मार्गदर्शनाखाली मौजे हातवळण येथे म्हेत्रे वस्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तावित प्रास्ताविकात श्री सचिन लोणकर कृषी सहाय्यक गलांडवाडी यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व सांगून उद्देश सांगितले. कृषी पर्यवेक्षक राजू पवार यांनी ऊस खोडवा उत्पादनाबाबत व पाचट व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र लक्ष्मण मेहेत्रे यांचे शेतावर पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमास श्री रमेश महादेव जगताप माजी सरपंच ,राजेंद्र म्हेत्रे, संजय म्हेत्रे, तुकाराम शिंदे, सौ रूपाली फडके, कृषी मित्र समाधान शिंदे व इतर प्रगतशील शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच कृषी पर्यवेक्षक राजू पवार, कृषी सहाय्यक सचिन लोणकर, हरीश देवरे उपस्थित होते .
कृषी सहाय्यक विशाल बारवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.