दौंड प्रतिनिधी- पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील वासुंदे येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयाला क्राॅम्प्टन सी एस आर फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी सीमा पावसकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, सहकारी अमित खंडाळे दत्ता लोंढे सोबत उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील मुलामुलींच्या स्वच्छतागृहाचा, व इलेक्ट्रिक उपकरणांसह विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य (स्किल) गुण अवगत होण्यासाठीच्या सुविधा क्राॅम्प्टन सी एस आर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिमा पावसकर यांनी सांगितले…
भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून गेली तीस वर्ष गेली तीस वर्ष एक रुपयाही फी न घेता मोफत शिक्षणाचे देण्याचं काम केले जात आहे. याचा फायदा जिरायत भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनीना होत आहे.
पुढील उच्च शिक्षणाची सोय या भागात जवळपास नसल्याने आणि मुलींचे शिक्षण माध्यमिक शिक्षणावरती थांबते त्यामुळे संस्थेच्या वतीने उच्च माध्यमिक शिक्षण देण्याची तयारी सुरु केली असल्याचे माहिती संस्थेच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना देत, भौतिक सुविधा ही उपलब्ध करून देण्याची मागणी संस्थेच्या वतीने प्रभाकर जांबले यांनी केली.
यावेळी सीमा पावसकर यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर. चांदगुडे, मानसिंग साळुंखे, दीपक जांबले, प्रभाकर जांबले, पोपट जगताप, रमेश खोमणे, अंकुश खोमणे, निलेश जांबले, दत्तात्रय जांबले, अथर्व जांबले, निशीकांत जाबले आदी उपस्थित होते..