प्रतिनिधी – रावणगाव येथे ऊस पाचट व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती मा उपसभापती, मा.श्री उत्तम आप्पा आटोळे, दौंड शुगर कारखाना गट ऑफिस अधिकारी श्री बहिरवाल, दौंड शुगर कारखाना अधिकारी श्री सोनवणे,श्री माने, मंडळ कृषि अधिकारी जगताप, कृषि पर्यवेक्षक कदम, कृषि सहाय्यक अझरुद्दीन सय्यद, अतुल होले, अंगद शिंदे, पाचट कुट्टी यंत्र धारक श्री विजय आटोळे,व इतर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी जगताप यांनी ऊस पाचट व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन, रब्बी हंगामातील गहू हरभरा बीजप्रक्रिया, शेतकरी मासिक याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.