प्रतिनिधी – माळेगाव कारखान्याने गत हंगामात गाळप झालेल्या उसाला ३२१७ रुपये अंतिम दर दिला पाहिजे, या व अन्य मागण्यांसाठी चक्री उपोषण आंदोलन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक सभासद व कष्टकरी शेतकरी समितीने कारखाना कार्यस्थळावर चक्री उपोषण सुरू केले आहे. गत हंगामात गाळप झालेल्या उसाला ३२१७ रुपये हा अंतिम दर मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसह उपपदार्थ प्रकल्पाचा खातेनिहाय नफा सभासदांना मिळावा यासाठी चक्री उपोषण करण्यात येत आहे. या चक्री उपोषणाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कारखान्याकडून शेतकऱ्यांचे महावितरणची वीज देयके वसुलीबाबत साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची ऑनलाईन बैठक आयोजित करून वसुली करण्याचा कट रचला जात आहे. याला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे. या बाबतचे निवेदन माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.राजेंद्र जगताप यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, “महावितरण हे जरी सरकारच्या अधिपत्याखाली असले तरी ते आज खाजगी लोकांच्या हातात आहे. तुम्ही सहकारी तत्वावर आहात जर आशा प्रकारे वसुली किंवा एजंटगीरी करणार आसाल तर आमच्या सुध्दा खाजगी वसुलीची माळेगाव कारखान्यानी जबाबदारी घ्यावी. तुम्ही जर कष्टकरी शेतकरी यांच्यावरती जोर जबरदस्ती करून वसूली केली तर संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व उद्भवनाऱ्या परिस्थीला कारखाना प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे माळेगाव कारखाना प्रशासनाने आपली भुमिका त्वरित स्पष्ट करावी..”
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप, बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक सागर गाडे, संदीप मोटे इ.पदाधीकारी उपस्थित होते.