पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्चशिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या सहकार्याने व सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील ( मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, शीख, नवबौद्ध, पारसी या समाजातील) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई च्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज (५ लाखापर्यंत) योजनेचे आयोजन, मार्गदर्शन मेळावा व त्वरित ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे प्रक्रियेचा शुभारंभ रविवारी दिनांक 03/10/21 रोजी सकाळी 11:00 वा. एकता इंग्लिश मीडियम स्कूल,मोरगाव रोड, बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणारे किंवा पहिल्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. याठिकाणी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात येतील अशी माहिती अल्ताफ सय्यद यांनी दिली.
- अधिक माहितीसाठी –
अल्ताफ सय्यद –9665526001
परवेज सय्यद – 9422327786
सुभान कुरेशी – 9881236821 - सलीम तांबोळी -9881020020
आसिफ झारी – 9860237786