प्रतिनिधी :- सध्या राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले याने भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांचा खाजगी डेटा गोळा केला असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे. मनोहर भोसलेची ही कुकर्म थांबवण्यासाठी क्रांतिकारी आवाज संघटना पाठपुरावा करत आहे. मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टल चा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत होता. तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो. असा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी केला आहे.
आज बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी हा गौफ्यस्फोट केला आहे. मनोहर भोसले याला भेटण्यासाठी कार्यकर्ते लोकांकडून बाहेर भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो. आणि भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जाते. दरम्यान च्या काळात.. माय रेशन या शासकीय पोर्टल मधून संपूर्ण कुटुंबाची माहिती काढून तीच माहिती भक्ताला सांगितली जाते. अशी हात चलाखी करून मामा भक्तांना उल्लू बनवत असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.
या शिवाय मनोहर भोसले याचा बॉडीगार्ड राघू देवकर हा पोलीस कर्मचारी मामाच्या भेटण्याच्या फी चे रक्कम स्वतःच्या अकाउंट वर घेत होता त्याचे पूरावे या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. त्यामुळेच पाठीमागेच संशयाच्या भोवऱ्यात असलेला राघू देवकर हा आता आरोपी होण्याची चिन्ह दिसत आहेत.
याशिवाय मनोहर भोसले ने सावंतवाडी गोजूबावी ता बारामती. जि. पुणे. व उंदरगाव ता करमाळा येथे बांधलेले दोन्ही मठ हे बेकायदेशीर आहेत. या दोन्ही मठाना कोणतेही परवानगी नाही किंवा या दोन्ही मठाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नाही. त्यामुळेच या मठाची घरपट्टी, पाणी पट्टी असा मिळकत कर ही बुडवाला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची पत्र क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी पत्रकार परिषद मध्ये सादर केली आहेत.
सोलापूर येथे दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील महिलेचे भविष्य सांगताना मनोहर भोसले याने. त्या महिलेला तुझे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचे चिठीत लिहून दिले होते. यात बारामती शहरातील एका राजकीय नेत्याचे नावं टाकल्याने मनोहर मामाने बारामती मध्ये स्वतःताच्या अडचणी वाढवून ठेवल्या आहेत.
दुसरीकडे क्रांतीकारी आवाज संघटनेने पहिल्यापासून दावा केला होता की. बाळुमामाच्या नावानं चांगभलं, रात्रीस खेळ चाले, 100डे या मालिकांना पैसा पुरवीला आहे. याचा निर्माता संतोष गजानन आयचीत हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर आहे. बारामती येथील गुन्ह्यात जप्त केलेली गाडी ही संतोष आयचित याच्या नावावर आहे. त्यामुळेच बेकायदा मार्गाने जमवलेल्या पैशात संतोष आयचीत देखील भागीदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
एवढी प्रॉपर्टी आली कोठून ?
मनोहर भोसले हा 2013 पर्यत झोपडीत राहत होता. आज त्याने पत्नीच्या नावावर 44 लाख रुपये किंमतीची 27 एकर जमीन, उंदरगाव येथे दीड एकर जमीन, उंदरगाव येथे एक हजार स्क्वेअर फूट चा बंगला, उंदरगाव येथे मठ, बारामती येथे मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट पाणी, संरक्षक भिंती, असा खर्च कुठून होतो असा प्रश्न क्रांतीकारी आवाज संघटनेने विचारला आहे. मनोहर भोसले यांनी रजिस्टर केलेली शिवसिद्धी संचालित मामा संस्था ही बारामतीत रजिस्टर असताना देणग्या मात्र उंदरगाव येथे गोळा केल्या जातं आहेत. शिवाय या देणग्या कशासाठी गोळा केल्या जातं आहेत याचं कारण पावतीवर नमूद केले नाही. अस मत मच्छिन्द्र टिंगरे यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले आहे. या पत्रकार परिषदेला मच्छिन्द्र टिंगरे नानासाहेब साळवे, आकाश दामोदरे आदी उपस्थित होते.