प्रतिनिधी, गणेश तावरे – भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातच नाही तर देशातच नाही तर जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. दोन खासदार वरून 303 खासदार येण्यापर्यंत भाजपने देशभर आपल्या पक्षाचे काम वाढवले आहे. आज सुद्धा महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे. विश्वासघातमुळे आम्हाला सत्तेत येता आले नाही याची नक्कीच उणीव लवकरच भरून काढण्यात येणार आहे .
परंतु त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती तालुक्यात भाजपाला अजून प्रभावशाली यश संपादन करता आले नाही याची खंत राज्याच्या व देशाच्या नेतृत्वाला नेहमीच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संघटनात्मक शक्ती बारामतीमध्ये वाढवून माझ्यासारख्या तरुणावरती भाजप पार्टीने बारामती तालुक्यात कमल फुलवण्याचे व घराघरात कमळ पोहोचवण्याचे काम दिले आहे त्यामुळे यापुढच्या काळात भारतीय जनता पार्टीचे घराघरात कमळ फुलवण्यासाठी संघटनात्मक ताकद वाढवण्याचा विचार पक्षाने केला आहे.
याप्रमाणे बारामतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला भाजपा जोमाने काम करणार असल्याचे उपाध्यक्ष गोविंद देवकाते यांनी सांगितले आहे.
गोविंद देवकाते संघाच्या मुशीत तयार झालेले बारामतीमध्ये गेले वीस वर्षे पासून सामाजिक कार्यात झोकून देणारे कार्यकर्ते आहेत . त्यामुळे बारामती मध्ये भाजपाचे काम वाढण्यास मदत होणार आहे त्यांच्या निवडीला बारामतीमधून , तरुणांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..