पूरग्रस्तांना मदतीच्या माध्यमातून अतुल बालगुडे यांचे कार्य कौतुकास्पद : अजित पवार

बारामती मधील देसाई इस्टेट येथून मदत पोहच झाली

बारामती : रायगड,रत्नागिरी येथील पूरग्रस्तांना मदत पाठविण्याचा उपक्रम म्हणजे माणुसकीचे दर्शन होय असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.देसाई इस्टेट चे नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या वतीने राष्ट्रवादी आपल्या सोबत अभियाना अंतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न धान्य, पाण्याच्या बाटल्या,कपडे,आदी टेम्पो भरून वस्तू देण्यात आल्या त्याचा शुभारंभ अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर,नगरपरिषद चे गटनेते सचिन सातव,बारामती बँक चे संचालक उद्धव गावडे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ,एसटी महामंडळ चे पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आणि संग्राम खंडागळे, राहुल वायसे,हेमंत नवसारे,अमोल पवार,साहिल शेख ,छगन आटोळे आदी उपस्तीत होते.


शासकीय स्तरावर मदत दिली जात असली तरी माणुसकी भावनेतून संस्था,मंडळे, व्यक्ती आदींनी पूरग्रस्तांना मदत करावी असेही आव्हान या वेळी अजित पवार यांनी केली .
यश बामणे,तोहीत शेख,दादा बोरावके,बाळासो आटोळे,अनिल खंडाळे, सूरज शिंदे,सोहेल अत्तार, महेश कोंडलिंगे,निलेश पवार,रोहित साळवे,काका वायसे आदींनी सदर उपक्रमास सहकार्य केले तर पुढील टप्प्यात रोग राई पासून पूरग्रस्तांना चे संरक्षण होणे साठी गोळ्या औषधे व इंजेशकन चा पुरवठा करण्यात येणार असल्याचे आयोजक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *